स्वागत आपले...

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

स्वप्न

झोपल्यावरही मी फक्त डोळेच मिटतो 
तू स्वप्नात कधी येशील,
याचीच वाट बघतो.

अदा

गर्दीतही  तिची नजर मलाच शोधायची  
तिच्या ह्याच अदाला  तर  माझी 
नजर फसायची 
फक्त तुझ्यासाठीच .............................

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

प्रेम

माझ्याही प्रेमात एकदा एक मुलगी पडली 
गाव येताच तिचा खूप खूप रडली




















                                                                                                                                                                    लक्ष्मन पेटारे 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

माझी आठवण

माझी आठवण
 माझी आठवण येतांना
हळूच हसतील डोळे 
 कावरी बावरी होईल नजर 
शब्द ऐकण्यासाठी माझे 
कान तुझे अतुरतील 
माझी आठवण येतांना 
सारखेच दिसू लागतील 
रस्त्यावरचे चेहरे
मंग तुला हि होईल 
बावरल्या सारखे चारचौघीत  
 माझी आठवण येतांना
 दिवस असेल सरत 
अशातच होईल तुझे मन उदास 
मंद होईल श्वास होतील पाऊलेही जड 
माझी आठवण येतांना 
जगशील रात्रभर 
अश्रू  निघतील डोळ्यातून 
माझ्यासाठी ................................

माझी आठवण येतांना ............ 
लक्ष्मन पेटारे